ग्रहांपासुन लाभ🌌🌍
आज आपण ग्रंह व त्यांपासून मिळणारे फायदे यावर लक्ष केंद्रित करणार आहोत.
सुरुवातीला मी एक त्यासंदर्भात प्रसंग सांगतो. एक व्यक्ती होता.तो पर्यंत्नाच्या बाबतीत मागे नव्हता. हुषार होता. पंरतु महाविद्यालय असो, किवा, त्याच्या करिअर क्षेत्रात तो, दचकून राहायचा. पुढे जाण्याची ईच्छा खूप पण त्याला तिथपर्यंत जाण्याची तयारी म्हणा, किंवा ,त्याचे पाउंल पुढे जात नव्हते. 'आत्मविश्वास" भरपुर होता पण तरीही करिअर क्षेत्रात मागे पडत होता. मग त्यावेळी त्याला एक मार्गदर्शन लाभले.आणि त्याचे आयुष्य नॅशनल हायवे ला लागले.
आता प्रत्यक्ष त्या व्यक्तिला पुढे जाण्याची खुप ईच्छा आहे पण तो तिथे आपल्यातील आव्हानात्मक समस्येवर मात करीत नाही . पंरतु यावेळेस आपण आपल्या आकाशातील ग्रहांवरील गोष्टींवर नजर टाकल्यास आपल्याला बरेच मार्ग उपलब्ध आहेत. आपल्या ग्रह मालेमध्ये गुरुंचे खुप महत्व आहे. या व्यक्तिचा अभ्यास आहे पण सहनशीलपणा तसेच वाचन कमी असल्यामुळे गुरु ग्रह त्याचे काम पूर्णत्वास नेऊ शकत नाही.कारण गुरु हा विद्वान, विचारवंत, ग्रंथ,वाचन लेखनाचा कारक आहे . जर त्यावेळेस या व्यक्तिने आपल्या समोरील समस्येवर मार्ग उपलब्ध ग्रंथ वाचन तसेच अन्य पर्याय उपलब्ध पुस्तक वाचून त्या समस्येवर मार्ग काढला असता. हा एक झाला गुणधर्म गुरुचा.
आता तुम्ही म्हणाल, आत्मविश्वास भरपूर तरीही मागे; कसे आहे. मिञहो नुसतेच आत्मविश्वास असुन चालत नाही .त्याला रवि व मंगळाचे गुणधर्म असावे लागतात.
रवि हा आधिकार देणारा,ग्रहं जबाबदारी घेणारा. व मंगळ आक्रमक,अहंकारी, महत्वाकांक्षी, नेतृत्व, काही वेळा अतिरेक होऊ शकतो.
रविजवळील जबाबदारी घेण्याची ईच्छा नसल्यामुळे फक्त आत्मविश्वास आपल्या कामाला येत नाही.कारण पुढे प्रत्यक्ष आपल्याला कशा परिस्थितीला सामोरे" जायचे हे आपल्याला कल्पना नसते.म्हणून आपल्याला प्रत्येक पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी आपल्या अंगी प्रत्येक ग्रहाचे गुणधर्म विकसित करावे लागतील.
निश्चितच त्याचा फायदा अद्भुत असा आहे . सर्व गुणसंप्नन म्हणजे काय हो तर 'वैविध्यपूर्ण" प्रत्येक व्यक्तिमत्त्वातील चांगल्या गुणांचा आदर्श घेऊन आपल्या आयुष्यात सामावून घेणे.
एवढे जर आपल्याला जमले तर आपणही आपल्या वाटेतील समस्येवर मात करून अद्भुत भविष्य निर्माण करु शकतो.
पुढे आपण उर्वरित ग्रहांची माहिंती प्रश्नांचा माध्यमातून घेऊ.
https://akshayhiremat.blogspot.com/2024/04/blog-post.html
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा